मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी व मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी यशंवत कॉलेज मैदानावर असणार वाहन पार्किंगची व्यवस्था;वाहन पार्क करून साहित्य स्वीकृतीसाठी पॉलिटेक्निक कॉलेज येथे हजर व्हावे लागणार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/01/2026 7:06 PM

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम निश्चित करुन दिलेला असून  गुरुवार, दिनांक १५.०१.२०२६ रोजी मतदान होणार असुन दिनांक १६.०१.२०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

तथापी दिनांक १४.०१.२०२६ रोजी मतदान साहित्य स्वीकृतीसाठी येणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांची होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी यशवंत कॉलेज मैदान आरक्षित केले असून सर्व मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी आपली वाहने यशवंत कॉलेज येथील मैदानामध्ये पार्क करून शासकीय तंत्रनिकेतन येथे साहित्य स्वीकृतीसाठी यावे असे महापालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.

त्याचप्रमाणे दिनांक १६.०१.२०२६ रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी सुद्धा मतमोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी याच यशवंत कॉलेज मैदानावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून सर्व मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या