नांदेड :- प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या संकल्पनेतून महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना Officer of the month व Employee of the month हा पुरस्कार देण्यात आला.
निवडणूक प्रक्रियेचे नियोजन व व्यवस्थापन चोख पद्धतीने केल्यामुळे माहे जानेवारी २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Officer of the month हा पुरस्कार उपायुक्त श्री नितीन दशरथ गाढवे यांना आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्याचप्रमाणे माहे नोव्हेंबर २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Officer of the month हा पुरस्कार सहाय्यक आयुक्त मनिषा शहाजी नरसाळे तसेच माहे डिसेंबर २०२५ साठी भांडारपाल श्री नागनाथ कानबाराव पतंगे यांना Officer of the month हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तसेच आस्थापना विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन माहे सप्टेंबर २०२५ साठीचा Employee of the month हा पुरस्कार वरिष्ठ लिपिक श्रीरंग संभाजी पवळे यांना तर माहे ऑक्टोबर २०२५ साठी वरिष्ठ लिपिक सोमेश्वर गोविंदराव तांबोळी यांना घोषित करण्यात आला. त्याचप्रमाणे निवडणूक कामी विशेष कामगिरी बजावल्या बद्दल माहे नोव्हेंबर २०२५ साठी संयुक्तपणे कनिष्ठ अभियंता रविंद्र संभाजी सरपाते व लिपिक मो.अब्दुल अल्लम मो.इकबाल यांना तर अतिक्रमण विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल माहे डिसेंबर २०२५ साठी संयुक्तपणे लिपिक अनिल गणपतराव चौदंते, लिपिक विशाल बालाजी सोनकांबळे व साप्रवि विभागातील आज्ञाधारक शिपाई सुजात अलीपिरसाब यांना तर माहे जानेवारी २०२६ साठी निवडणूक विभागातील वरिष्ठ लिपिक संतोष माणिकराव जोशी यांना Employee of the month म्हणून घोषित करून त्यांना आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ त्यांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनपाचे माजी पदाधिकारी व नवनिर्वाचित सन्माननीय सदस्य तसेच अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादिक तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार व सन्मान झाल्याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.