प्रजासत्ताक दिनाचे ध्येय साध्य करण्यासाठी माहिती अधिकाराचा प्रसार..
सांगली — प्रजासत्ताक दिनाचे ध्येय साध्य करण्यासाठी माहिती अधिकाराबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जानेवारी महिन्यात भारतीय माहिती अधिकारच्या सांगली जिल्हा प्रतिनिधी श्री. सुखदेव केदार यांच्या वतीने माहिती अधिकार दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.
याअंतर्गत नगर भूमापन अधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, जिल्हा माहिती व जनसंपर्क विभाग, बार असोसिएशन कार्यालय तसेच न्याय विभागातील विविध कार्यालयांमध्ये दिनदर्शिका देण्यात व लावण्यात आल्या.
या दिनदर्शिकेत माहिती अधिकार कायद्याची मूलभूत माहिती व नागरिकांचे हक्क यांचा समावेश असून प्रशासनात पारदर्शकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.