नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी वित्त व लेखाधिकारीपदाचा
अतिरिक्त कार्यभार वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. राजेश
साहेबराव शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
डॉ. राजेश शिंदे यांनी नुकताच प्रभारी वित्त व लेखाधिकारीपदाचा अधिकृत कार्यभार
स्वीकारला आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ.
ज्ञानेश्वर पवार तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी त्यांचे
अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या आर्थिक व लेखा व्यवस्थापनास अनुभवी नेतृत्व लाभणार
असून, डॉ. शिंदे यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक व प्रशासकीय अनुभवाचा विद्यापीठास
निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीबद्दल विद्यापीठ परिसरासह शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळातून विविध स्तरांतून
डॉ. शिंदे यांचे अभिनंदन होत आहे.