शिक्षण मंडळ भगूर संचालित श्री. एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि. 17/01/2026 ते 23/01/2026 या कालावधीत मु. पो. साकुर, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथे यशस्वीपणे संपन्न झाले.
या शिबिराचा समारोप समारोह दि. 23/01/2026 रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. एकनाथराव शेटे हे उपस्थित होते. यावेळी स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून “पाणी आडवा, पाणी जिरवा” या विषयाचे महत्त्व नागरिकांना प्रभावीपणे पटवून दिले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्था कार्यकारिणी सदस्या श्रीमती हेमांगी ताई पाटील, मुख्याध्यापिका प्रज्ञा बाविस्कर, गावचे पोलीस पाटील शिवाजी सहाणे, तुकाराम सहाणे, भाऊसाहेब कडभाने, दिनकर सहाणे, सोमनाथ सहाणे , सोपान सहाणे रामभाऊ उगले गणपत सहाणे भिमराव सहाणे विष्णु सहाणे दामू आवारी त्र्यंबक आवारी आधी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात श्री. एकनाथराव शेटे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक भान, श्रमसंस्कार व राष्ट्रसेवेचे महत्त्व विशद करून मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी शिबिरातील विविध उपक्रम तथा श्रमदानाचे, सेवाभावाचे महत्व विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबिराच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुप्रिया हंडोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रेरणा कुलकर्णी यांनी केले.
या विशेष शिबिराच्या कालावधीत सातही दिवस गावातील विविध भागांमध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांना चुना व घेरू यांच्या साह्याने रंग देणे, तसेच हिमोग्लोबिन वाढीसाठी घरगुती उपायांबाबत पत्रकांचे वाटप करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या शिबिराचे कार्यक्रम अधिकारी प्रा. तुषार तेलोरे यांनी सातही दिवस स्वयंसेवकांना विविध उपक्रमांद्वारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी साकुर मधील सर्व ग्रामस्थांनी गावाच्या वतीने महाविद्यालय आणि सर्व प्राध्यापक,कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मानित केले,यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.