मोहोळ (जि. सोलापूर) —
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोहोळ तालुक्यात भारतीय माहिती अधिकार चळवळीच्या वतीने माहिती अधिकार दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व भारतीय माहिती अधिकार मोहोळ तालुका प्रतिनिधी श्री. मारुती मोठे यांनी केले.
यावेळी मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय नरखेड, नरखेड पोलीस चौकी तसेच शाळांमध्ये भेट देऊन अधिकाऱ्यांना व शिक्षकांना माहिती अधिकार दिनदर्शिका देण्यात आली. माहिती अधिकार कायद्यामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढते व नागरिक सशक्त होतात, असा संदेश देण्यात आला.