🔵 उपाध्यक्ष म्हणून तौफिक देवगिरी, अभिजीत दाणेकर
आणि कार्यवाह वसीम सय्यद यांना संधी
------------------------------------------------------
मिरज शहरातील सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेल्या मिरज सुधार समितीच्या वार्षिक बैठकीत मिरज सुधार समितीच्या अध्यक्षपदी नरेश सातपुते यांची तर, समन्वयकपदी पुन्हा शंकरतात्या परदेशी यांची निवड करण्यात आली. समितीच्या उपाध्यक्षपदी तौफिक देवगिरी, अभिजीत दाणेकर, कार्यवाहपदी वसीम सय्यद, सहकार्यवाह झीशान मुश्रीफ, खजिनदारपदी रामलिंग गुगरी, संपर्कप्रमुखपदी श्रीकांत महाजन, सहसंपर्कप्रमुखपदी अझीम बागवान यांना संधी देण्यात आली.
शुक्रवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिवशी मिरज सुधार समितीची वार्षिक बैठक समितीचे संस्थापक अॅड. ए. ए. काझी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत मावळते अध्यक्ष राकेश तामगावे यांनी गेल्या वर्षभरापासून मिरज सुधार समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच, विविध सामाजिक प्रश्नांवर करीत असलेल्या पाठपुराव्याबाबत माहीती दिली. त्यानंतर निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. अध्यक्षासह अन्य पदावर अनेक सदस्य इच्छुक असल्याने लोकशाही पध्दतीने गुप्त मतदान प्रक्रिया राबवून निवडी करण्यात आल्या.
मिरज सुधार समितीच्या नुतन कार्यकारणीत : असिफ निपाणीकर, संतोष जेडगे, राकेश तामगावे, हाजी शाहीदअहमद पिरजादे, सुभान सौदागर, संदीप हंकारे, सलीम खतीब, शब्बीर बेंगलोरे, जावेद शरीकमसलत, शमशोद्दीन देवगिरी, अमीर डांगे, राजेश पाटील, सुरेश झेंडे, रविंद्रबापू नाईक, राजू क्षीरसागर, सईद सौदागर, रविंद्र कांबळे, मौलाना इर्शाद शेख, दिनेश तामगावे, उदय सखदेव, इम्रान जमादार, अमित नाईक, तौसिफ मणेर, अय्याज मोमीन, रसूल मलाबादे, विजय कवाडे, फरहान शेख, अरीकराज जॉन जोसेफ, शिराज शिकारी, गुंडुराव कांबळे, रणजित कांबळे, शाहबाज सय्यद, रईस पठाण, सुशांत दुर्गाडे, अमर गवळी, हैदर पठाण, अमोल सोनार, मुस्तकिम शेख आदी कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, समितीचे कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड. इर्शाद पालेगार आणि अॅड. गिरीश जगनाडे यांची निवड करण्यात आली आहे.