नांदेड :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड व शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वा. पासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हदगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित उद्योजक (कंपनी), शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने 301 पेक्षा अधिक पदांसाठी खाजगी आस्थापनामध्ये रोजगार व नोकरीच्या संधीसाठी मुलाखती घेण्यात येणार असून जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी गुरूवार 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वा. पासून शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था हदगाव येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्कासाठी मा. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर नांदेड ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दुरध्वनी क्रमांक02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.