राज्य महिला कुस्ती स्पर्धेचे उदघाटन संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/02/2026 12:01 PM

सांगली: महाराष्ट्र राज्य कुस्तीतील संघाच्या मान्यतेने २० वर्षाखालील महिला राज्य अजिंक्य पदक कुस्ती स्पर्धा सन २०२५- २६ चे आयोजन सांगली शहर जिल्हा तालीम संघ सांगलीच्या वतीने करण्यात आले होते 

 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीने २० वर्षाखालील महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते  

या स्पर्धेची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सांगली शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आली  तसेच राज्यातून आलेल्या महिला कुस्तीपटूंनी स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहिली 

यावेळी राहुल पवार म्हणाले की, वसंतदादा कुस्ती केंद्रातून अनेक स्तरावर मल्ल पोचलेत महाराष्ट्रातील महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी यांना वाढीव मानधन मिळवून देण्यात अजित दादांचा मोठ योगदान आहे त्याचबरोबर या पुढच्या काळात सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धा आम्ही भरणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले 

यावेळी महाराष्ट्र केसरी मोहन माळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे, श्रीनिवास मिल्कचे प्रशांत पाटील , सचिन पाटील ,सदाशिव मलगान, प्रा.नितीन शिंदे, सुनील चंदनशिवे ,प्रताप एडके अभिजीत पाटील तसेच राज्यभरातून आलेले आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या