सांगलीतील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपूल उभारून आता दीड वर्ष उलटून गेले आहे. मात्र, अत्यंत खेदाची बाब म्हणजे या पुलावर अद्याप एकही विजेचा खांब बसवण्यात आलेला नाही. दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीने या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्रमुख मुद्दे:
आयर्विन पुलाला समांतर असलेल्या नवीन पुलावर विजेचे दिवे लागले, पण चिंतामणीनगरचा पूल अजूनही अंधारात का?
रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी जुना पूल पाडून नवा पूल बांधला, पण त्याचे अधिकृत उद्घाटनही झाले नाही.
कॉलेज कॉर्नर ते माधवनगर जकात नाक्यापर्यंतच्या या वर्दळीच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
खानापूर, आटपाडी, तासगाव या भागातून येणारी जड वाहतूक याच मार्गावरून चालते, अशा वेळी अपघाताची टाळण्यासाठी वीज असणे गरजेचे आहे.
लोकहित मंचच्या माध्यमातून आमचा प्रशासनाला सवाल आहे की, नागरिकांच्या सुरक्षेशी हा खेळ का? या पुलाला विजेचा मुहूर्त कधी लागणार? लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का?
*मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.