नांदेड़ :- नांदेड शहर व परिसरात तापमानाचा पारा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, शहर आणि परिसरातील नागरिकांचे उष्माघातापासून संरक्षण व्हावे, यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका,आरोग्य विभाग नागरिकांना खालीलप्रमाणे आवश्यक ती काळजी घेण्यासाठी आवाहन करीत आहे.
*उष्माघाताची लक्षणे ओळखा:*
*शरीराचे तापमान वाढणे (102° फॅरेनहाइट किंवा त्याहून अधिक)
*त्वचा लाल होणे आणि कोरडी पडणे
*घाम न येणे
*तीव्र डोकेदुखी
*मळमळ आणि उलटी
*चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवणे
*हृदयाचे ठोके वाढणे
*श्वास घ्यायला त्रास होणे
*गोंधळ उडणे किंवा बेशुद्ध होणे
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी खालील उपाययोजना करा:
*जास्त प्रमाणात पाणी प्या:
*दिवसभरात नियमितपणे पाणी प्या.
*लिंबू सरबत, नारळ पाणी, ताक यांसारख्या पेयांचा आहारात समावेश करा.
*हलके आणि सुती कपडे वापरा:
*फिकट रंगाचे, सैलसर आणि हवा खेळती राहतील असे कपडे परिधान करा.
*उन्हात जाणे टाळा: विशेषतः सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत उन्हात जाणे शक्यतो टाळा.
*डोक्याचे संरक्षण करा: उन्हात बाहेर पडताना टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करा.
*थंड ठिकाणी राहा: घरात किंवा थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा.
*पंखा, कूलर किंवा वातानुकूलित यंत्राचा वापर करा.
*जड आणि तेलकट अन्न टाळा: पचनास हलके असलेले आणि ताजे अन्न घ्या.
*मद्यपान आणि चहा-कॉफी टाळा: या पेयांमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
*शारीरिक श्रमाचे काम टाळा: उन्हाच्या वेळी जास्त शारीरिक श्रम करणे टाळा.
*वाहनात काळजी घ्या: बंद असलेल्या वाहनात लहान मुले, वृद्ध आणि पाळीव प्राणी यांना ठेवू नका.
*आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या: लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिला यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो, त्यांची विशेष काळजी घ्या.
*उष्माघात झाल्यास त्वरित काय करावे:*
*उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड आणि हवेशीर ठिकाणी घेऊन जा,त्यांचे कपडे सैल करा.
* कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवा किंवा बर्फ लावा.
*ओआरएस (ORS) किंवा लिंबू पाणी द्या.
*त्वरित जवळच्या महापालिका आरोग्य केंद्रात किंवा नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका,आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.