14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सांगली गव्हर्नमेंट कॉलनी येथील शिवराय, शाहू ,फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने गेल्या कित्येक वर्षापासून महापालिका क्षेत्रात सामाजिक कामातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
मा सतिश साखळकर, आनंदराव पाटील (ए डी पाटील) शाहीन शेख, अजितराव सूर्यवंशी, डॉक्टर सुधीर कुंभार, सुनील कुंभार, विजया हिरेमठ, सचिन साळुंखे, सुरेश माने, सुनिता कांबळे, महेश पाटील यांना सुधा त्यांच्या विविध कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने मिळालेला पुरस्कार हा फार मोठा बहुमान आहे असे वाटते
सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये आपण काम करत असताना मनात एखादी खंत येऊन जाते आपण काम करतो आपल्याला आवड आहे त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांना त्याचा उपयोग होत असतो मात्र खरोखर समाजापर्यंत आपले काम जाते का असा प्रश्न काही वेळेला मनात पडत असतो मात्र खरोखर आपण काम करत असताना समाजातील काही असे घटक आहेत जे आपले काम पाहत असतात आणि योग्य वेळी अशा लोकांना सन्मान करून त्यांना उत्साहित करत असतात त्यातील एक संस्था म्हणजे शिवराय, शाहू, फुले ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच
काही संस्था कशा पद्धतीने पुरस्कार देतात त्याबद्दल नाही बोललेले बरे.
सदर विचार मंच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने काम करताना दिसला आहे त्याचे कारण गेल्या कित्येक वर्षांपासून दर जयंतीला दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दत्तक घेतले जाते तसेच शैक्षणिक साहित्य देण्यात येत आहे तसेच जयंती निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करून लहान मुले , महिला यांच्या कलागुणांना वाव देण्याचा सुद्धा उपक्रम सदर संस्था राबवत आहे
धन्यवाद सर्व पदाधिकारी संचालक व कार्यकर्ते शिवराय ,शाहू ,फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच सांगली
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा