सांगली : महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रातील मानाच्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघ निवडण्यात येणार असून सदर निवड चाचणी दि. २१ व २२ फेब्रुवारी रोजी वायफळे (ता. तासगाव) येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा शहर जिल्हा तालिम संघ सांगली यांच्या मान्यतेने ,जय बजरंग बली कुस्ती कमिटी आणि खंडेराया व्यायाम संस्था, वायफळे व पै पंकज पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा हिणार आहेत अशी माहिती सांगली शहरजिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै राहुल पवार यांनी दिली
सदर चाचणी मध्ये निवडलेला संघ सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व असून मल्लांना महाराष्ट्र केसरी स्पर्धा गाजवण्याची ही सुवर्ण संधी आहे , असे पै राहुल पवार म्हणाले .
तरी जिल्ह्यातील सर्व वजनी गटातील मल्लांनी या मोठ्या संख्येने चाचणीस सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांगली शहरजिल्हा तालीम संघाच्या वतीने करण्यात आले आहे
सदर स्पर्धा या ५७ ,६१,६५,७० ,७४ ,७९, ८६ ,९२ , ९७ व महाराष्ट्र केसरी वजन गट ८६ ते १२५ अश्या वजनी गटात होणार आहे , सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुस्तीगीराचा जन्म हा २००६ च्या आधीचा असावा , २००७ चा जन्म असलेल्या कुस्तीगीराला पालकांचे संमती पत्र व मेडिकल प्रमाणपत्र जमा करून सहभाग होऊ शकतो अशी माहिती तालीम संघाचे सरचिटणीस पै.सुनिल चंदनशिवे यांनी दिली अधिक माहिती ९९२२३०११५५ या नंबर संपर्क साधावा.