सांगलीची जीवनवाहिनी असलेल्या कृष्णा नदीची आज जी अवस्था झाली आहे, ती पाहून मन हेलावून जात आहे. कारखाने, उद्योग आणि शहरांचे प्रक्रिया न केलेले ९० दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज थेट नदीत मिसळत आहे. परिणामी, हजारो माशांचा मृत्यू झाला असून नदीपात्रात केवळ विष उरले आहे.
लोकहित मंच, सांगलीच्या वतीने आमचे काही रोकठोक सवाल:
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासन केवळ नोटीस देण्यातच धन्यता मानणार का?
मंत्रालयात पडून राहिलेल्या सांडपाणी प्रक्रिया योजनांना मंजुरी कधी मिळणार?
नदीकाठच्या गावांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ आता थांबणार की नाही?
कृष्णा नदी केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि अस्तित्वाचा आधार आहे. जर आज आपण गप्प बसलो, तर पुढच्या पिढीला आपण केवळ प्रदूषित आणि मृत नदी वारशात देऊ.
प्रशासनाने तात्काळ जागे होऊन यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल!
आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.