🗳️ १६ सदस्यीय स्थायी समितीवर सदस्यांच्या निवडीची घोषणा; ४ प्रभाग समित्यांची नवी रचना निश्चित
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेची नवनिर्वाचित सदस्यांची पहिली ऐतिहासिक सर्वसाधारण सभा आज महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील सभागृहात उत्साहात संपन्न झाली. या सभेत महानगरपालिकेच्या सत्तेचा कणा मानल्या जाणाऱ्या 'स्थायी समिती'सह 'महिला व बालकल्याण' आणि 'समाजकल्याण' समितीच्या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
तसेच शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या ३० कोटींच्या नवीन नाट्यगृहाच्या बांधकामालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
सभेच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
💎 १. स्थायी समिती सदस्य निवड (१६ सदस्य):
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३१ (अ) नुसार पक्षीय तौलनिक संख्याबळानुसार खालील १६ सदस्यांची निवड करण्यात आली:
* भारतीय जनता पार्टी (०८ सदस्य): सौ. पद्मश्री पाटील, सौ. मालूश्री खोत, श्री. मोहन वाटवे, श्री. गणेश माळी, श्री. अतुल माने, श्री. उदय बेलवलकर, ॲड. सौ. स्वाती शिंदे, सौ. कीर्ती देशमुख.
* भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (०४ सदस्य): सौ. बबीता मेंढे, सौ. स्मिता यमगर, सौ. दिपाली पाटील, श्री. मयूर पाटील.
* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (०३ सदस्य): श्री. अभिजीत भोसले, सौ. शिरीन पिरजादे, श्री. मैनुद्दीन बागवान.
* राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट - ०१ सदस्य): श्री. सुरेश लक्ष्मण बंडगर.
👩 २. महिला व बालकल्याण समिती निवड:
विशेष समिती अंतर्गत महिला व बालकल्याण समितीवर खालील १६ सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली:
* भारतीय जनता पार्टी : सौ.विद्या नलवडे,सौ. रईसा शिकलगार, सौ. बानू जमादार, सौ. योगिता राठोड, सौ. रोहिणी पाटील, सौ. मीनाक्षी पाटील, सौ. वैशाली गवळी, सौ. लक्ष्मी सरगर.
* भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: सौ. अश्विनी कोळेकर, सौ. अंजली जाधव, सौ. मुब्बशिरिन बागवान, सौ. बिलकिस बुजरूक, सौ. अश्विनी कदम
* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी: सौ. नसिमा नाईक, सौ. अश्विनी कोळी, सौ. रेश्मा चौधरी.
🤝 ३. समाजकल्याण समिती गठन:
अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या ११ सदस्यांची समाजकल्याण समितीवर नियुक्ती करण्यात आली:
* भारतीय जनता पार्टी : रवींद्र सदामते, प्राजक्ता धोतरे, उज्वला कांबळे, दीपक वायदंडे, गीता पवार, मनीषा कुकडे, गाथा काळे, अलका ऐवळे.
* शिवसेना: सागर वनखंडे.
* भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: रमेश सर्जे.
* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी: रेखा कांबळे.
🎭 हनुमाननगर येथे भव्य नाट्यगृह उभारणार:
सांगली येथील हनुमाननगर (सर्वे नं. ३३४) या जागेत सुमारे २९,९६,५६,८९५/- (३० कोटी) रुपये खर्चून महानगरपालिकेचे नवीन अद्ययावत नाट्यगृह उभारण्याच्या प्रस्तावास महासभेने एकमताने मंजुरी दिली.
🗺️ ४. प्रभाग समिती निहाय वॉर्ड रचना:
शहरातील नागरी समस्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रभाग समिती रचना करण्यात आली आहे:
1. प्रभाग समिती क्र. १: वॉर्ड क्र. १०, ११, १२, १३, १४
2. प्रभाग समिती क्र. २: वॉर्ड क्र. १५, १६, १७, १८, १९
3. प्रभाग समिती क्र. ३: वॉर्ड क्र. ०१, ०२, ०८, ०९
4. प्रभाग समिती क्र. ४: वॉर्ड क्र. ०३, ०४, ०५, ०६, ०७,२०
"आजच्या निर्णयामुळे महानगरपालिकेचे प्रशासकीय जाळे वॉर्ड स्तरापर्यंत पोहोचले आहे. स्थायी आणि विशेष समित्यांच्या माध्यमातून आता लोकहिताचे निर्णय अधिक वेगाने घेतले जातील."
— श्री. सत्यम गांधी (आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड मनपा)
🗣️ "लोकशाही प्रक्रियेतून विकासाची नवी सुरुवात" – महापौर धीरज सूर्यवंशी
सभेचा समारोप करताना महापौर म्हणाले की,
> "आजची पहिली महासभा ही शहराच्या विकासाची नांदी आहे. सर्व समित्यांच्या गठनामुळे प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल. ३० कोटींच्या नाट्यगृहामुळे सांगलीच्या सांस्कृतिक चळवळीला नवसंजीवनी मिळेल. सर्व सदस्यांनी पक्षभेद विसरून शहराच्या हितासाठी कटिबद्ध राहा
या सभेला उपमहापौर, सभागृह नेता , विरोधी पक्ष नेता, सर्व सदस्य,अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त,सर्व अधिकारी उपस्थित होते.