विधानसभा मतदारसंघातील कुपवाड क्षेत्रामधील सुमारे ३० ते ३५ रहिवासी पर्यटक म्हणून दुबई येथे गेलेले असताना इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या बातम्या समोर आल्या.
या गंभीर पार्श्वभूमीवर संबंधित नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्यांच्याशी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची व सुरक्षिततेची सविस्तर चौकशी केली. तरीही त्यांच्या सुरक्षित परतीसाठी आणि आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी संबंधित यंत्रणांशी सातत्याने त्यांनी संपर्क ठेवला आहे.
मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा हीच माझी सर्वोच्च जबाबदारी असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाच्या समन्वयातून त्वरित मदत पोहोचविण्यास मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार महोदयांनी यावेळी दिली.