मिशन लक्ष्यवेध अंतर्गत विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर प्रवेशाकरिता अर्ज सादर करावेत

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 05/03/2026 8:47 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा दि.: क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर यांच्याद्वारा प्रथम टप्प्यात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत कोल्हापूर येथे शूटिंग व कुस्ती, कुरुंदवाड जि. कोल्हापूर येथे वेटलिफ्टिंग व सांगली येथे रोईंग अशा खेळांचे विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर सुरु करण्यात येणार आहे.

प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, याकरिता राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त व राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू तसेच दि. ३१ डिसेंबर, २०२६ रोजी वय २५ वर्षे आतील असणे आवश्यक आहे. अशी किमान अर्हता असून मागील २ वर्षातील कामगिरीचे मुल्यांमापन करण्यात येईल. तसेच क्रीडा कौशल्य व शारिरीक क्षमता चाचण्या घेऊन, प्रशिक्षणार्थीची निवड अंतिम करण्यात येणार आहे. विभागीय स्तरावरील स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटरमध्ये निवड होणा-या खेळाडूंना निवास, भोजन, गणवेश व प्रशिक्षण, तज्ञ मार्गदर्शक इ. सुविधा पुरविण्यात येणार आहे व यावरील खर्च शासनाद्वारे करण्यात येणार आहे.

तरी वर नमूद केलेल्या अर्हता धारक खेळाडूंनी आपले अर्ज दि. १२ मार्च, २०२६ पर्यंत विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम, रेसकोर्स नाका, संभाजीनगर, कोल्हापूर (दूरध्वनी क्र. ०२३१-२९५११०८) येथे प्रत्यक्ष अथवा dydkop@gmail.com या ई-मेलवर विहीत मुदतीत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केलेले आहे.


Share

Other News

ताज्या बातम्या