महानगरपालिका व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई;मोर चौक ते छत्रपती चौक रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 28/04/2026 7:16 PM

नांदेड :- नांदेड शहरातील सर्व भागातील अतिक्रमणे काढण्यासाठी सध्या महानगरपालिकेने विशेष मोहिम सुरु केली असुन त्याचाच भाग म्हणुन उत्तर नांदेड भागातील रहदारीसाठी पर्यायी रस्ता म्हणुन ओळखला जाणारा मोर चौक ते छत्रपती चौक या रस्त्यावरील रस्याच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेने धडक कारवाई केली असुन मंगळवार दिनांक २८.०४.२०२६ रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक व पोलीस प्रशासनाने या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण काढुन टाकले आहे.

काबरा नगर भागातील प्रमुख रस्त्यापैकी मोर चौक ते छत्रपती चौक या रस्त्यावरील अतिक्रमणे काढुन टाकण्याची कार्यवाही महानगरपालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पार पाडली आहे. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने जवळपास ५० ते ६० अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली तसेच तब्बल ०२ ट्रक माल जप्त करण्यात आला आहे.

सदरील कारवाई *पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तांबे व त्यांच्या पथकाच्या सहकार्याने वजिराबाद शहर वाहतुक शाखेचे नागरगोजे यांच्या सोबत अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, अतिक्रमण पथक प्रमुख दत्ता कल्याणकर यांच्यासह महापालिकेचे ३० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील २० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

महानगरपालिका हद्दीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.शहरातील मुख्य रस्ते अथवा इतरत्र अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासना तर्फे देण्यात येत असुन यापुढे सुध्दा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरुच राहील असे यावेळी मनपा *उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांनी स्पष्ट केले.

Share

Other News

ताज्या बातम्या