पीएच.डी. कोर्सवर्क (Backlog) परीक्षा उन्हाळी–२०२६ साठी अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 28/04/2026 6:00 PM

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संकुल व संशोधन केंद्रांतील पीएच.डी. कोर्सवर्क अनुत्तीर्ण (Backlog) विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी–२०२६ परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार ऑफलाईन व लेखी (Pen & Paper) स्वरूपात घेण्यात येणार असून संबंधित विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज आपल्या संबंधित संशोधन केंद्र किंवा संकुल येथे सादर करावेत. परीक्षा शुल्क रुपये ३१०/- इतके निश्चित करण्यात आले आहे. अर्ज स्वीकृतीचा कालावधी ४ ते ७ मे २०२६ असा आहे.
संशोधन केंद्रांनी परीक्षा अर्जाचे शुल्क धनादेश/RTGS/NEFT द्वारे “लेखाधिकारी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड” यांच्या नावे आयडीबीआय बँक, लोहटी कॉम्प्लेक्स, वजीराबाद, नांदेड येथील खाते क्रमांक :- 0500104000028422 या खात्यावर जमा करावे. संबंधित IFSC कोड IBKL0000500 आहे. शुल्क भरण्याची अंतिम तारीख ८ मे २०२६ असून, संशोधन केंद्रांनी अर्ज व शुल्कासह परीक्षा विभागात सादर करण्याची अंतिम मुदत ११ मे २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
सर्व संबंधित विद्यार्थी, संशोधक व मार्गदर्शकांनी वरील सूचनांचे पालन करून निर्धारित कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या