जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त स्व-गणना करावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 28/04/2026 8:33 PM

नांदेड :- भारताची जनगणना-2027 ही पहिली डिजिटल जनगणना लवकरच सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सर्व नगारिकांनी येत्या 1 ते 15 मे पर्यंत स्व-गणना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्ह्यातील प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, एनएसएस व एनसीसीचे समुपदेशक यांची बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. 
 
स्व-गणनेची माहिती se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 1 ते 15 मे 2026 पर्यंत भरता येईल. नोंदणी केलेली संपूर्ण माहिती ही गोपनीय राहणार असून स्व-गणनेत नांदेड जिल्हा प्रथम येईल, अशा पद्धतीने सर्वांनी स्व-गणनेचे नियोजन करुन जास्तीत जास्त स्वगणना करावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या