कुपवाड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा, अधिकाऱ्यांसह कर्मचारी धारेवर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/03/2026 4:28 PM


***उपमहापौर गजानन मगदूम यांची प्रभाग कार्यालयात बैठक

कुपवाड :- प्रतिनिधी
 कुपवाडसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर गजानन मगदूम व प्रभागसमिती सभापती श्रीमती माया गडदे यांनी प्रभाग कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसह तातडीची बैठक घेतली.
बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कमी दाबाने पाणी येण्यामागील कारणांचा सविस्तर आढावा घेत, गळती, अपुऱ्या दाबाची लाईन व तांत्रिक अडचणी त्वरित दूर करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी उपमहापौर मगदूम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून याबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. तक्रारींचे तत्काळ निराकरण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
स्थानिक नागरिकांनीही पाणी समस्येबाबत नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावेळी नगरसेवक चेतन उर्फ ऋषीकेश सूर्यवंशी ,रविंद्र सदामते, दिपक वायदंडे नगरसेविका योगिता राठोड, मीनाक्षी पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पाटील, अजित दुधाळ, प्रथमेश गडदे,मुद्दसर मुजावर पाणीपुरवठा अभियंता अमिरहमजा मुलाणी,कनिष्ठ अभियंता रोहित लोखंडे यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या