अहिल्यानगर, दि. – निवृत्तीवेतनधारक तसेच कंपनीचे नियोक्ते आणि प्रतिनिधी यांच्यासाठी ‘निधी आपके निकट’ हा विशेष कार्यक्रम शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता गंगाधर गुणे आयुर्वेदिक कॉलेज, विश्रामबाग, माळीवाडा, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमामध्ये भविष्यनिर्वाह निधीशी संबंधित विविध सेवा, तक्रारी व समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे. तसेच, तांत्रिक किंवा प्रशासनिक अडचणींबाबत मार्गदर्शनही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
भविष्यनिर्वाह निधीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कर्मचारी भविष्य निधी संघटना यांच्या सहायक भविष्य निधी आयुक्त यांनी केले आहे.
#MaharashtraShasan #GovernmentOfMaharashtra #EPF #Pensioners #Ahilyanagar #PublicNotice #SocialSecurity #WorkerRights