* चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ शताब्दी वर्षात समतामूलक भारताचा संकल्प * मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस *

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 22/03/2026 10:31 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

* रायगड, दि. :- * महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड (रायगड) येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षा निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शताब्दी वर्षा सुरुवात आज देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण आणि परिसराचे सुशोभीकरणासाठी 55 कोटी 80 लाख निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचे भूमी पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार रामदास आठवले, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोजगार हमी

योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, रायगड जिल्हा

परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार धैर्यशील पाटिल, आमदार प्रवीण दरेकर, महाड नगराध्यक्ष सुनिल कविस्कर, डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से.), प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दीपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से.) आयुक्त, समाज कल्याण, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे (भा.प्र.से.), रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले (भा.प्र.से.), पोलीस अधीक्षक आंचल दलाल (भा.पो.से.), विविध विभागांचे अधिकारी, विविध सामाजिक संघटना आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी चवदार तळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णांकृत पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आपल्या भाषणाची सुरुवात करीत

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 1923 मध्ये सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा कायदा झाला असला तरी समाजातील काही घटकांनी त्याची अंमलबजावणी रोखली. या अन्यायाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक समतेचा क्रांतिकारी टप्पा ठरला. "हा संघर्ष केवळ पाणी पिण्यासाठी नव्हता, तर विषमता आणि अस्पृश्यतेच्या व्यवस्थेविरुद्ध उभारलेला मानवतेचा लढा होता, " असे त्यांनी अधोरेखित केले.



Share

Other News

ताज्या बातम्या