मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप योजनेत अर्ज करण्यासाठी २७ मार्च अंतिम मुदत

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/03/2026 7:24 PM

नांदेड :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्ती क्षमतेचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या बचत गटांनी आपले अर्ज सादर करण्यासाठी तसेच त्रुटींची पूर्तता करण्यासाठी २७ मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

ज्या बचत गटांनी योजनेसाठी अर्ज प्राप्त करून घेतले आहेत, परंतु अद्याप भरून समाज कल्याण कार्यालयाकडे सादर केलेले नाहीत, तसेच ज्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांनी निश्चित मुदतीत आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालयात सादर करावेत. अपूर्ण अथवा त्रुटीयुक्त अर्जांची आवश्यक पूर्तता करून घेणे अनिवार्य आहे.

अर्जातील त्रुटींबाबत माहिती मिळवण्यासाठी संबंधितांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड कार्यालयाशी संपर्क साधावा. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज किंवा त्रुटींचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या