इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर यांना राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहिर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 28/03/2026 10:52 AM

नांदेड : अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते व नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार इंजि. चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर यांना महाराष्ट्र पोलीस सोशल असोसिएशन लातूर तर्फे देण्यात येणारा नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
         रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भालचंद्र ब्लड बँक सभागृह, मध्यवर्ती बस स्टँडजवळ, लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार -२०२६ चे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनचे संस्थापक सचिव व कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुफी सय्यद शमशोद्दीन, लातूर यांनी दिली.
        इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना यापूर्वी असंख्य पुरस्कार मिळाले असून ते झुंजार लढाऊ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक, विचारवंत, व्याख्याता व पत्रकार  आहेत. त्यांना यापूर्वी भरपूर मिळाले आहेत. लातूर येथील नेताजी सुभाष चंद्र बोस राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या