*भगूरमध्ये उत्साहात पार पडला श्रीराम जन्मोत्सव*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 27/03/2026 2:36 PM

*भगूरमध्ये उत्साहात पार पडला श्रीराम जन्मोत्सव*
 श्रीरामनवमी निमित्त वारकरी संप्रदाय परंपरेप्रमाणे राम नामाचा गजर आणि कीर्तन, प्रवचनातून त्यांच्या आदर्श वचनाचा जागर सप्ताह व रामनामाच्या धाग्याने समाजाला जोडणारी मंगलमय शोभायात्रा संपन्न झाली.
भगूरमध्ये श्रीराम मंदिर टेकडी येथे गुढीपाडवा ते श्रीरामनवमी यादरम्यान उत्साहाच्या वातावरणामध्ये श्रीराम जन्मोत्सव पार पडला. गुरुवार दि.19 पासून या उत्सवाला कीर्तन सप्ताहाने सुरुवात झाली.दि. 19 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी 9 वा.मंदिरातील सर्व देवी देवतांची नगराध्यक्षा सौ.प्रेरणा विशाल बलकवडे, मयूर शेटे,मंदिर समिती ट्रस्टी अरुण चव्हाण यांच्या हस्ते  पूजाअर्चा, वीणा पूजन व श्रीहनुमान भजनी मंडळ,श्री गजानन महाराज भजनी मंडळ यांच्या भजनाने सप्ताहाची सुरुवात झाली.दररोज दुपारी 1 ते 4च्या दरम्यान सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, 5 ते 6 हरिपाठ व रात्री 9 ते 11 हरीकीर्तन असा सप्ताहाचा दिनक्रम होता.या याप्रसंगी हभप. जगदीश महाराज जोशी, शिवा महाराज आडके, बाळासाहेब महाराज बिन्नर, चंद्रकांत रक्ते, भगूर रत्न गणेश महाराज करंजकर, योगेश महाराज धात्रक, पुरुषोत्तम महाराज घुमरे इ. महाराजांची कीर्तन सेवा पार पडली. तसेच सप्ताहाची सांगता हभप. सोपान महाराज जयंतमहल यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.दुपारी 12 वाजता श्रीरामांची महाआरती करण्यात आली.त्यानंतर सावरकर जन्मभूमी मित्र मंडळाच्यावतीने भाविकांना साबुदाणा खिचडी व मट्ठ्याचे वाटप करण्यात आले.सायंकाळी 6वा. श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांचा जिवंत देखावा असलेल्या राथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी विहिंपचे ज्येष्ठनेते श्री एकनाथराव शेटे,निवृत्त पोलीस अधिकारी रमेश पवार,नगराध्यक्षा सौ प्रेरणा बलकवडे, उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, नगरसेवक, दीपक बलकवडे, विशाल बलकवडे, शंकर करंजकर,काकासाहेब देशमुख,अमोल इंदारखे, बबलू जाधव,सुदेश वालझाडे,मृत्युंजय कापसे,सौ सुजाता शिरसाट, विद्या बलकवडे,लताबाई थापेकर,जयश्री देशमुख,सुचित्रा बुरके,सोनाली सोनवणे,मनिषा कस्तुरे, प्रतिष्ठित मान्यवर व समस्त भगूरकर नागरिक,समस्त वारकरी, टाळकरी,श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिराचे पुजारी आकाश नेहरे,योगेश चंद्रात्रे, श्री स्वप्निल जे अहिरे बाळासाहेब शिंदे  किशोर मोजाड, शिवाजी भागवत, नारायण आडके, भास्कर सोनवणे,विशाल शिरसाट, संदीप शेटे, जितेंद्र जाधव,सचिन झुटे,ललित भदे, चंद्रकांत रकटे कचरू मते रोशन चौधरी, सोमनाथ भदाणे, दिनेश शहाणे संपत देशमुख सौरभ चंद्रात्रे अमेय सोनवणे रवी बोराडे वसंत सोनवणे विष्णू सोनवणे इत्यादिंनी मेहनत घेतली.

Share

Other News

ताज्या बातम्या