*शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे राजहंस सहकारी दूध संघ संगमनेर येथे क्षेत्रभेट*
श्री एकनाथराव सहादु शेटे कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे व्यावसायिक क्षेत्रभेट यशस्वीरित्या पार पडली.
या दरम्यान राजहंस दूध संघ अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना डेअरी उद्योगाची कार्यपद्धती, दूध संकलन, उत्पादन प्रक्रिया,पॅकिंग व विपणन तसेच राजहंस अक्वा प्रक्रिया व पाणी शुद्धीकरण याविषयी सविस्तर माहिती दिली. उद्योगातील रोजगार विषयक माहिती देऊन व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृत्युंजय कापसे यांनी विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण अधिक परिणामकारक असते हे विद्यार्थ्यांना सांगितले.प्रा. तुषार तेलोरे, प्रा.रोहिणीजगताप,प्रा.अश्विनी ठाकरे, प्रा. मेघा काळे,प्रा. सुप्रिया धोंगडे, प्रा.पुनम मगर, प्रा. कुलकर्णी यांच्या समवेत विद्यार्थी देखील उपस्थित होते.