अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ज्ञानेश्वर दिंडीमध्ये उपमहापौर गजानन मगदुम यांचा सहभाग

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/04/2026 6:51 PM

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुपवाड राम नवमी ते हनुमान जयंतीनिमित्त अंखड हरिनाम सप्ताह निमित्त ज्ञानेश्वर दिंडीमध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला.

या पवित्र सोहळ्यात कुपवाड शहरातील वारकरी भक्त, तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. दिंडीतील भक्तिमय वातावरण, टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष, आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद मनाला समाधान देणारा होता.

अशा आध्यात्मिक परंपरा आपल्या संस्कृतीची ओळख असून, त्या पुढील पिढ्यांपर्यंत जपल्या जाणे गरजेचे आहे.

– उपमहापौर गजानन मगदूम

Share

Other News

ताज्या बातम्या