*एनडीएसटी ॲण्ड एनटी सोसायटीच्या*
*उपाध्यक्षपदी संग्राम करंजकर*
नाशिकरोड:- जिल्ह्यातील शिक्षकांची अग्रगण्य संस्था असणाऱ्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नॉन टीचिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या उपाध्यक्षपदी भगूर नगरपरिषदचे माजी नगरसेवक संग्राम शिवाजीराव करंजकर यांची बिनविरोध निवड झाली.
सोसायटीचे अध्यक्षा विजया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव निरगुडे, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा.रवींद्र मोरे, साहेबराव कुटे, किशोर जाधव, निलेश ठाकूर, यशवंत ठोके या मान्यवरांसह मावळते उपाध्यक्ष विलास जाधव, सेक्रेटरी प्राचार्य अशोक बागुल, ज्येष्ठ संचालक, अरुण पवार, मोहन चकोर, बाळासाहेब ढोबळे संजय देसले, दत्तात्रय आदिक, दीपक व्याळिज, निंबा कापडणीस,मंगेश सूर्यवंशी, समीर जाधव, अनिल देवरे, भारती पाटील, एस.टी.पाटील, संजय वाघ, गंगाधर पवार, एस.पी.देवरे, सचिन पगार, भाऊसाहेब शिरसाठ, चंद्रशेखर सावंत आदींसह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल श्री.करंजकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.