महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी अर्ज करण्यास 25 एप्रिलपर्यत मुदतवाढ

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 09/04/2026 7:46 PM

नांदेड  :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 पोकरा अंतर्गत गावांमध्ये गावस्तरीय कृषी अवजारे बँक हा घटक राबविण्यात येत आहे. याचा मुख्य उद्देश अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना कृषी अवजारांच्या उच्च किंमतीमुळे उद्भवणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी व यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून कृषि उर्जेचा वापर वाढविणे हा आहे. या अंतर्गत गावांतील महिला शेतकरी गटांना कृषी यांत्रिकीकरणासाठी आवश्यक कृषी अवजारे उपलब्ध करुन देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु आता अर्ज 25 एप्रिल 2026 ही अंतिम मुदतवाढ दिली आहे.  

पात्रता निकष :
प्रकल्प गावातील एमएसआरएलएम/माविम पुरस्कृत महिला बचतगट व गाव संघ पात्र राहतील. अर्जदार गटात वेगवेगळया कुटूंबातील किमान 10 सदस्य असणे आवश्यक. ज गटांना यापूर्वी कोणत्याही योजनेतून कृषी अवजारे बँकेसाठी लाभ मिळाला आहे, ते गट अपात्र राहतील. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास निवड प्रक्रीया ऑनलाइ्रन लॉटरी पध्दतीने केली जाईल. 
लाभ
प्रकल्प मूल्यांच्या 60 टक्के पर्यत अनुदान (कमाल 24 लाख रुपये). प्रकल्प मूल्य 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास राष्ट्रीयकृत बँकेकडून प्रकल्प मूल्यांच्या 75 टक्के कर्ज घेणे बंधनकारक राहील. या योजनेसाठी अर्ज एफपीओ-डीबीटी पोर्टल https://dbtndksp.mahapocra.gov.in वरुन ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम तारखेस मुदतवाढ देण्यात आली असून, 25 एप्रिल 2026 करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या गटांना गावस्तरावर कृषी अवजार बँक स्थापन करण्यासाठी विविध प्रकारची कृषी यंत्रसामग्री घेणे अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरचलित औजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी/लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कंबाईन हार्वेस्टर, फवारणी पंप, इत्यादी कृषी अवजारांचा समावेश आहे. 

प्रकल्प क्षेत्रातील पात्र महिला शेतकरी गटांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कराावेत असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा नांदेड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा प्रकल्पाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Share

Other News

ताज्या बातम्या