सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या **श्रीम. संजीता मोहपात्रा (भा.प्र.से.)** यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच सांगलीकरांना आवाहन केले आहे. आपल्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ किंबा हार आणण्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी **’पुस्तके’** अथवा *शाळे साहित्य* भेट द्यावीत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार, अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. संजीता मोहपात्रा यांची बदली सांगली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. त्या **बुधवार, दिनांक १५ एप्रिल २०२६** रोजी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
पुष्पगुच्छापेक्षा ज्ञानाची भेट मौल्यवान!
नूतन आयुक्तांनी त्लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना आवाहन केले आहे की:
* स्वागतासाठी पुष्पगुच्छ किंवा हार आणू नयेत.
* त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तके, स्पर्धा परीक्षांचे साहित्य किंवा प्रेरणादायी पुस्तके भेट द्यावीत.
* ही जमा झालेली सर्व पुस्तके महानगरपालिकेच्या शाळांतील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व ग्रंथालयांसाठी वापरली जातील.
महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिक आणि हितचिंतकांना या अभिनव ‘पुस्तक आणि शाळे साहित्य दान’ चळवळीत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.