10 एप्रिल ’वर्ल्ड हाेमिओपॅथी डे’ हा दिवस दर वर्षी संपुर्ण जगामध्ये साजरा केला जाताे. आज 10 एप्रिल 2026. 10 एप्रिल 1755 हा दिवस डाॅक्टर सॅम्युअल हॅनीमन यांचा जन्म दिवस ज्यांनी ह्या जगाला हाेमिओपॅथी ही एक आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती दिली आहे. त्यामुळे हा दिवस ’वर्ल्ड हाेमिओपॅथी डे‘ म्हणून साजरा केला जाताे. डाॅक्टर सॅम्युअल हॅनीमन यांनी शाेधून काढलेल्या उपचार पद्धतीमुळे बरेचशे रुग्ण बरे हाेत आहेत आणि याच कारणामुळे आज हाेमिओपॅथी सर्व जगामध्ये परिचित झाली आहे .
डाॅक्टर सॅम्युअल हॅनीमन यांच्या काळात बऱ्याचशा वैद्यकीयउपचार पद्धती हाेत्या. यातील काही अघाेरी म्हणजे त्रासदायक हाेत्या. त्यांचा लाेकांना आजारापेक्षा उपचाराचा जास्त त्रास हाेत असे. तसेच ते स्वत: वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांचे उपचार करायचे पण त्यांना त्या अघाेरी किंवा त्रासदायक पध्दती आवडत नसत आणि बऱ्याच आजारांमध्ये त्यांच्या हे लक्षात आले की मी एवढं चागलं औषध देऊन देखील काही आजार हे परत परत येत आहेत. त्यांच्या मनाला ही गाेष्ट पटत नव्हती आणि त्यामुळे त्यांनी काही काळासाठी वैद्यकीय सेवा बंद केली व वेगवेगळ्या पुस्तकांचे ट्रान्सलेशन (एका भाषेतील पुस्तक हे दुसऱ्या भाषेत रुपांतरीत करणे) करु लागले. असेच एकदा एक औषधी पुस्तक (मटेरिया मेडीका) रुपांतरीत करत असतांना त्यांना एक सिंकाेनिया ऑङ्खिसीनालिस नावाचे औषध मिळाले ज्यामुळे त्यांच्या पत्नीचा ताप जाे बऱ्याच दिवसांपासून काेणत्याही औषधाने कमी हाेत नव्हता ताे कमी झाला. या घटनेनंतर त्यांनी या विषयावर बराचसा अभ्यास आणि संशाेधन केले आणि हाेमीओपॅथी शाेधून काढली. आता बऱ्याच जणांना माहिती आहे की हाेमीओपॅथी आजार मुळासकट बरा करते. त्याचा शरिरावर इतर कुठलाही दुष्परिणाम हाेत नाही तसेच हाेमीओपॅथी ही आपली प्रतिकार शक्ती वाढविते.
आता हाेमीओपॅथी मध्ये बरेचसे संशाेधन सुरु आहेत, त्यामुळेही आता हाेमीओपॅथी बऱ्याचशा आजारामध्ये प्रभावशाली काम करत आहे. सध्याचे आपले जीवन, लहान मुले असाेत, गृहीणी स्त्रीया असाे अथवा नाेकरी असणाऱ्या महिला असाे, पुरुष असाे , व्यापारी वर्ग, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, अभ्यास करणारे विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती तसेच छाेटे माेठे काम करणारे लाेक या सर्वांनाच ताणतणाव स्ट्रेस आहे. आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांसाठी हाेमीओपॅथी अतिशय लाभदायी आहे. कारण यामध्ये रुग्णांचा शारिरीक आणि मनाचा अभ्यास करुन औषधी दिली जाते. त्यामुळे रुग्णांना त्यांचा आजार पूर्णपणे बरा हाेण्यास मदत हाेते . लहान मुलांना हाेणारा परत परत त्रास ज्यामुळे त्यांची प्रतिकार क्षमता कमी हाेते व तसेच बऱ्याच जणांना वेगवेगळ्या अॅलर्जी असतात. बऱ्याच जणांना वेगवेगळे हार्माेनल प्राॅब्लेम असतात, अनेकांना पचनक्रियेचे वेगवेगळे आजार असतात तसेच अजून अश्या बऱ्याच आजारामध्ये हाेमीओपॅथी भरपूर लाभदायी ठरत आहे. तसेच ज्या रुणांना असं वाटतं की आता संपूर्ण उपचार करुन झाले, आता आपण थकलाे आहाेत, परंतु पाहिजे तसा आराम मिळत नाही अशा वेळेस त्यांनी हाेमीओपॅथीची मदत घ्यावी. ज्यामध्ये रुग्णांचा संपूर्ण अभ्यास केला जाताे व औषधाेपचार केला जाताे. त्याचा रुग्णांस बऱ्याचसा फायदा हाेताे. हाेमीओपॅथीक औषधी ही अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वच जण घेऊ शकतात. त्याचा काेणताही दुष्परिणाम शरिरावर हाेत नाही. उलट प्रतिकार शक्ती वाढविण्यास त्याची मदतच हाेते. तेंव्हा रुग्णांनी या हाेमीओपॅथीक औषधांचा वर्ड हाेमीओपॅथी डे निमित्ताने उपचार घ्यावा.
डाॅ.संताेष खरात (एम.डी.तज्ञ)