जिल्हा परिषदेत फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 10/04/2026 8:11 PM

नांदेड - जिल्हा परिषद नांदेड येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव 2026 निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
     आज 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार असून, यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
       दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रेल्वे स्टेशन नजीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास जिल्हा परिषद परिसरातून बँड वाजत-गाजत मिरवणूक काढून अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, दत्तात्रय गिरी, प्रशांत थोरात, मयूर आंदेलवाड, अमित राठोड, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, राहुल भोजराज, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माधव सलगर, दिलीपकुमार बनसोडे, कृषी अधिकारी नीलकुमार ऐततवडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
      त्याच दिवशी सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद परिसरात अन्नदान व पाणी वाटपाचा कार्यक्रम होणार असून, सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयुक्त जयंती महोत्सवाचे अध्यक्ष रणजीत गजभारे, सचिव राजेश जोंधळे, कार्याध्यक्ष धनंजय गुम्मलवार, कोषाध्यक्ष विजय वाघमारे, सहसचिव राघवेंद्र मदनुरकर, बालाजी नागमवाड, अशोक मोकले, प्रसिद्धीप्रमुख मिलिंद व्यवहारे जितेंद्र तोटलवार, उज्वला गजभारे, स्वाती जोंधळे, कीर्ती मिवळे, बालाजी टोके, सुनील कदम, दीपक महालिंगे, नंदलाल लोकडे, गणेश आंबेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या