एका आमराईच्या शांत सावलीत तो वृद्ध माणूस पडून होता…
जाणारे-येणारे लोक त्याला फक्त “एक गरीब” म्हणून पाहत होते. कुणी दोन घास देऊन पुढे निघून जात होतं, पण त्याच्या मनात काय चाललं आहे, त्याच्या अंगात पेटलेला ताप, त्याच्या आयुष्याची वेदना—हे कुणालाच दिसत नव्हतं…
तो स्वतःच्या विचारात हरवून झोपेच्या आहारी गेला होता.
इतक्यात एक लहानसा मुलगा—असिफ—त्याच्या जवळ आला.
“काका, तुम्हाला काय झालं आहे?”
त्या एका प्रश्नात माणुसकी होती… आपुलकी होती…
वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं.
त्याने आपली सारी व्यथा त्या मुलासमोर मोकळी केली…
असिफने क्षणाचाही विलंब न करता सावली बेघर निवारा केंद्राचे संचालक मुस्तफा मुजावर यांना फोन केला. परिस्थिती ऐकताच सावलीचे कर्मचारी तातडीने दुचाकीवरून तेथे पोहोचले. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी त्वरित महापौर धीरज भाऊ सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला.एक फोन… आणि माणुसकी धावून आली…ताबडतोब रुग्णवाहिका आली आणि त्या वृद्धाला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
उपचारानंतर त्यांना सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या आणि दीनदयाळ आजीविका योजनेअंतर्गत चालणाऱ्या “सावली बेघर निवारा केंद्रात” आणण्यात आले…
चौकशी केली असता कळलं—
ते एक पुजारी होते…लोकांच्या पूजा करून, पोरोहित्य करून आयुष्य जगणारे…पण नियतीने त्यांना एकटं केलं होतं…
जवळचं कुणी नव्हतं… दूरचे नातेवाईक होते, पण त्यांना स्वीकारायला कुणी तयार नव्हतं…तीन महिने…सावलीच त्यांचं घर बनलं…
तेथील कर्मचारीच त्यांचे कुटुंब बनले…
आणि एक दिवस…ते शांतपणे या जगाचा निरोप घेऊन गेले…ही बातमी नगरसेवक उदय बेलवलकर यांना कळवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर दोन नातेवाईक पुढे आले…
सावलीचे सर्व कर्मचारी, ते दोन नातेवाईक…आणि शेवटच्या प्रवासासाठी तयार झालेला एक “एकटा” जीव…
स्मशानभूमीत पोहोचल्यावर,
संस्थाचालक मुस्तफा मुजावर यांनी त्यांना शेवटचं पाणी पाजलं…
आणि अश्रू ढाळत अग्नी दिला…
ही फक्त एका वृद्धाची कथा नाही…
ही माणुसकी जिवंत असल्याची साक्ष आहे…जिथे नाती तुटतात, तिथे “सावली” उभी राहते…जिथे आपले सोडून जातात, तिथे “इन्साफ” साथ देतो…
🙏मुस्तफा मुजावर सारख्या लोकांच्या मुळे, आणि सावलीच्या सेवेमुळे—
आजही समाजात माणुसकी जिवंत आहे…9111911914, 9021516176