आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा, दि. एप्रिल व मे महिन्यातील कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देऊ नये, यासाठी मी सर्व संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
ज्या ठिकाणी टँकरची मागणी येईल, त्या ठिकाणी तात्काळ भेट देऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा. तसेच जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवावा.
ग्रामीण भागातील बंद पडलेले हातपंप तातडीने दुरुस्त करावेत. ज्या ठिकाणी नवीन विहिरींची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी नवीन विहिरी घेण्यासह दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. टंचाईच्या काळात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन देयका अभावी तोडू नयेत, याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरेल, यासाठी योग्य नियोजन करून पाण्याचा वापर करावा. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला प्राधान्याने पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करावे.
जिल्ह्यात कुठेही पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, ही माझी अपेक्षा आहे.