महात्मा गांधी वसतिगृहाची अवस्था भयावह, त्वरीत कार्यवाही करा अन्थया आंदोलन : मनोज भिसे, लोकहित मंच अध्यक्ष

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/05/2026 10:49 AM

सांगलीतील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आता तरी जागे व्हा! 📢
​सांगली-मिरज रोडवरील 'महात्मा गांधी वसतिगृहाची' अवस्था अत्यंत भयावह झाली असून, गरिबांच्या मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी या विदारक परिस्थितीवर वारंवार प्रकाश टाकूनही प्रशासन अजूनही ढिम्म आहे!
​🔴 वसतिगृहाची सद्यस्थिती:
​इमारतीची झालेली पडझड आणि असुरक्षित बांधकाम.
​पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छतेचा प्रचंड अभाव.
​विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न.
​एकूणच परिस्थिती पाहता, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोकहित मंच, सांगली च्या वतीने आम्ही प्रशासनाला यापूर्वीच इशारा दिला आहे.
​आमची लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती:
मा. पालकमंत्री, मा. खासदार आणि मा. आमदार महोदयांनी या विषयात तातडीने लक्ष घालून प्रशासनाला कडक निर्देश द्यावेत.
​आमच्या प्रमुख मागण्या:
१) इमारतीचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करण्यात यावी.
२) शुद्ध पाणी, वीज आणि स्वच्छतागृहांची सोय तातडीने सुधारावी.
३) वसतिगृह परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत.
​जर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित कार्यवाही केली नाही, तर लोकहित मंच च्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल!
विनीत,
लोकहित मंच, सांगली.
🗓️ दिनांक: २६ मे २०२६

Share

Other News

ताज्या बातम्या