ॲड.गौतम हाणमंत भद्रे यांना यंदाचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार' जाहीर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/05/2026 7:08 PM

नांदेड : अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने दिला जाणारा यंदाचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा असलेला 'छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार २०२६' नांदेडचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. गौतम हाणमंत भद्रे यांना जाहीर करण्यात आला आहे.
फुले-आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक,राजकीय, आर्थिक,सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रातील त्यांच्या निःस्वार्थ व उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे,अशी अधिकृत घोषणा पुरस्कार निवड समितीच्या वतीने करण्यात आली.अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने नुकतेच त्यांना या पुरस्काराचे निवडपत्र प्रदान करण्यात आले.सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी २६ जून २०२६ रोजी सिडको,नवीन नांदेड येथे पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते ॲड.गौतम भद्रे यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती 'छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार २०२६' निवड समितीचे प्रमुख ॲड. सुजाता पोहरे,डी.एस.वाघमारे,
बा.रा.वाघमारे यांनी दिली आहे.
ॲड.गौतम भद्रे यांच्या या यशाबद्दल आणि त्यांना हा मानाचा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल ॲड.शेख शकील बशिरोद्दीन,ॲड.पंकज कसबे,पत्रकार पवन जगडमवार, ॲड.शेख मुदस्सीर,ॲड.सुमित पवळे,ॲड.संतोष गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय,कायदेशीर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या