नांदेड :- नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी 01 उप विभागीय पोलीस अधिकारी व 04 पोलीस उपनिरी, 03 ग्रेडपोउपनि, 05 पोलीस अंमलदार व 01 वश्रेलि असे एकुण 14 अधिकारी व अंमलदार हे नियत वयोमानानुसार दिनांक 30.05.2026 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक भोकर मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड शहर, श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप-अधिक्षक कंधार, यांचे हस्ते आज सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेट वस्तु देवुन सत्कार करण्यात आला.
सर्व सेवानिवृतांनी आपल्या कुटूंबास वेळ द्यावा आणि आरोग्यांची काळजी घेवून सुखी आणि आनंदी जिवन जगण्याचा सल्ला दिला. सदर कार्यक्रम मंथन हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे पार पडला सेवानिवृत्त समारंभास श्री जगदीश मंडलवार, पोनि पोलीस कल्याण विभाग, यांचेसह अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अच्युत मोरे, अनैतिक मानव शाखा यांनी केले असुन पोहेकॉ/1752 हनमंत पोतदार, पोकॉ/ मारोती कांबळे, नरेंद्र राठोड पीआरओ कार्यालय, मपोकॉ /सविता भिमलवाड, पोलीस कल्याण विभाग यांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे केले आहे.