घरपट्टी प्रश्नी बुधवारी जनसुनावणी, कृती समितीचा निर्णय

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/06/2026 7:44 PM


***प्रक्रियेतील त्रुटींना न्यायालयात  आव्हान देणार

सांगली,ता.४ ः घरपट्टी प्रश्‍नी लोकांच्या तक्रारी ऐकूण घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी येत्या बुधवारी (ता.१०)  गणेशनगरातील रोटरी सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता जनसुनावणी घेण्यात येणार आहे. हरकतदार मालमत्ताधारकांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी द्याव्यात असे आवाहन आज वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे. येथील विवेकानंद ज्येष्‍ठ नागरिक सभागृहात आज प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. 
बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.द.बर्वे म्हणाले,‘‘ घरपट्टी मनमानी पध्दतीने रेटण्याचा प्रयत्न होतोय. लोकांनी जागृत होऊन यातील त्रुटीविरोधात शक्य त्या मार्गाने आवाज उठवला पाहिजे.’’
माजी नगरसेवक हनुमंत पवार म्हणाले,‘‘ भांडवली मुल्यावर आधारीत घरपट्टी आकारणीला विरोध न करता ही घरपट्टी परवडणारी आणि न्याय्य हवी. त्यासाठी न्यायालयात जाऊन या प्रक्रियेत न्यायालयाने हस्तक्षेप करून महापालिकेला मार्गदर्शक सूचना द्याव्यात अशी आपली भूमिका असेल. कायदा वाऱ्यावर सोडून प्रशासन निष्ठूरपणे प्रक्रिया पुढे नेत आहे. त्यासाठी पुढील आठवडाभरातच आपल्याला न्यायालयात जावे लागेल.’’
यावेळी नागरीक जागृती मंचचे सतीश साखळकर म्हणाले,‘‘ सरसकट विरोधाची भूमिका न घेता घरपट्टी न वाढवता महापालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे अशा सूचना आपण केल्या पाहिजेत. दिलेल्या नोटीसा समजून घेणे आणि चुकीच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी नागरीकांनी मोठ्या संख्येने हरकती घ्याव्यात.’’
रवींद्र वळवडे म्हणाले,‘‘ महापालिका दरवर्षी मागणीच्या निम्मी घरपट्टीही वसूल करीत नाही. थकबाकीदार वर्षानुवर्षे करच भरत नाहीत. उपयोगकर्ता कर, भारांक, इमारतींचा वापर प्रकार, व्यावसायिक वापर याविषयी अनेक त्रुटी आहेत. त्याबद्दल प्रशासनाला जाब विचारला पाहिजे.’’
ग्राहक पंचायतीचे ज्ञानचंद्र पाटील म्हणाले,‘‘ हरकती कशा घ्याव्यात याविषयी कायदेशीर मार्गदर्शन समितीच्यावतीने केले जात आहे. त्याचा नमुना जनसुनावणीदिवशी सर्वांना  दिला जाईल.’’
बैठकीतल चर्चेत........यांनी भाग घेतला.   
..........
बैठकीतील निर्णय
० जनसुनावणीसह व्यापक जनजागृती करणार.
० घरपट्टीविषयीची माहिती पुस्तिका तयार करणार.
० घरपट्टी आकारणीतील त्रुटींविरोधात न्यायालयीन लढा.
० नगरसेवक-लोकप्रतिनिधीना विरोधाची निवेदने देणार. 
..........
 कुलदीप देवकुळे प्रेमचंद पांडे जी श्री तोडकर श्री दामले रविकांत मिरजकर मद्वावांना सर इतर जेष्ठ नागरिक उपस्थित होते  

ज्यांना ज्यांना आपल्या जन सुनावणी मध्ये लेखी सूचना द्यायच्या आहेत  त्यांनी खालील ई-मेल आयडी अथवा व्हाट्सअप नंबर वर आपल्या लेखी सूचना पाठवाव्यात.
Satishsakhalkar19@gmail.com 

 9881066699
9823058868
9763488586
7821075221

Share

Other News

ताज्या बातम्या