भाजपा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक विक्रम पावसकर यांच्या उपस्थीतित भाजपाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/06/2026 6:15 PM

भारतीय जनता पक्ष सांगली शहर व ग्रामीण यांच्या वतीने आज खरे सांस्कृतिक मंगल कार्यालय, सांगली येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा विधानपरिषद आमदार श्री.निरंजनजी डावखरे, आमदार श्री.विक्रमजी पाचपुते आणि भाजपा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक श्री. विक्रम पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय संघटनात्मक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीस उपस्थित राहून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी कार्यक्रमांचे नियोजन, पक्षविस्तार, बूथ सक्षमीकरण तसेच जनतेपर्यंत शासनाच्या लोकहितकारी पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित भाऊ देशमुख, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, नितीनराजे शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्या नीताताई केळकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, कोल्हापुर पश्चिम जिल्हा प्रभारी पृथ्वीराज पाटील, भाजपा नेते शरद लाड, चिमणभाऊ डांगे, सर्व प्रदेश पदाधिकारी, मनपा महापौर, भाजपा शहर आणि ग्रामीण पदाधिकारी, कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.


Share

Other News

ताज्या बातम्या