*गेल्या 30 ते 35 वर्षातील पहिलीच घटना - नागरिकांकडून समाधान व्यक्त
सांगली प्रतिनिधी :-- सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी आज सकाळी सांगलीतील महावीर उद्यानामध्ये अचानक भेट देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि पोलीस खात्याकडून अपेक्षा जाणून घेतल्या. गेल्या 35 ते 40 वर्षाच्या कालखंडात अशा तऱ्हेने सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या आणि पोलीस खात्याकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेणारे पहिलेच पोलीस अधिकारी असल्याने नागरिकांमधून त्यांचे आभार मानण्यात आले.
दरम्यान आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तुषार दोषी हे लोकहित मंचचे संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे यांच्या पुढाकाराने महावीर उद्यानात पोहोचले आणि त्यांनी जेष्ठ नागरिक,तरुण त्याचबरोबर हास्य क्लब सदस्य, महिला यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि पोलीस खात्याकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेतल्या.
नागरिकांकडून ज्या समस्या आणि अडीअडचणी तसेच अपेक्षा व्यक्त झाल्या आहेत त्याबाबत पुढील काळात योग्य ती कार्यवाही करून पोलीस खात्याकडून खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिले आहे.
तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी यावेळी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळत महावीर उद्यानाबाहेर असलेल्या चहाच्या टपरीवर लोकहित मंचचे संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे यांच्यासह ग्रीन टी चा आस्वाद घेतला.