नांदेड :- जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत “नवीन सेवार्थ प्रणाली e-bill” संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण यांच्यासाठी बुधवार 10 जून 2026 रोजी सकाळी 11 वा. तसेच नांदेड वगळता सर्व तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी गुरुवार 11 जून 2026 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन भवन नांदेड येथे करण्यात आले आहे. संबंधीत लेखा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती शोभा मुंडे यांनी केले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात नवीन सेवार्थ प्रणालीच्या कार्यपदधती, अद्ययावत वैशिष्टये तसेच व्यवहारातील अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण श्रीमती वैशाली ताटापल्लेवार, अप्पर कोषागार अधिकारी व अप्पर कोषागार अधिकारी नामदेव राठोड तसेच नियुक्त मास्टर ट्रेनर कनिष्ठ लेखापाल शंकर दुमाने, लेखा लिपीक प्रमोद शिंदे, बसवेश्वर वाळके, सुनिल संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणार आहे. संबंधीत सर्व विभागांनी या प्रशिक्षणाचे लाभ घ्यावा व वेळेवर उपस्थित राहावे, असेही आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.