कुपवाड दि, ३०,
अन्यायी भांडवलीमूल्य घरपट्टी वाढ रद्द करण्यासाठी आज कुपवाड शहर संघर्ष समिती व कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या वतीने कुपवाड प्रभाग समिती कार्यालय क्र.3 येथे लक्षवेधी घंटानाद आंदोलन करण्यात आले.घंटा व टाळ वाजवून,जोरदार घोषणा दिल्याने कार्यालय परिसर दणाणून गेला होता.यावेळी सहा आयुक्त श्री. सचिन सागावकर यांना निवेदन देण्यात आले व प्रशासनापुढे भावना व्यक्त केल्या..
गेल्या काही दिवसांपासून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने खाजगी यंत्रणे मार्फत सर्व्हे करून घरपट्टी दरवाढ केलेली असून ती पूर्ण चुकीची व मनमानी पद्धतीने आकारण्यात आली असून या बाबत नागरिकांमध्ये तीव्र प्रमाणात नाराजी आहे. आकारलेली अवाजवी अवास्तव कर कुपवाड शहराच्या नागरिकांना मिळणाऱ्या सांगली मिरजेच्या तुलनेत अपुऱ्या व काही सुविधा नसताना जास्तीचा कर आकारण्यात आलेला आहे. तो अन्यायी आहे. मोकळे प्लॉट व भाडेकरू असलेल्या इमारती, घरांना व अवाजवी मनमानी पद्धतीने कर आकारणी करण्यात आलेली आहे तसेच चुकीच्या पद्धतीने मालकाचे नाव असताना भोगवटदार म्हणून भाडेकरूचे नाव भोगवटदार म्हणून लावले आहे. कुपवाड गावठाण व विस्तारित परिसरात ड्रेनेज योजना पूर्ण नसताना जलनिस्सारण कर, दुरुस्ती खर्च आकारण्यात आलेला आहे. कुपवाड शहर व परिसर अविकसित आहे तरतरी दुर्गानगर, शिवशक्तीनगर, राजारामबापू सोसायटी, वाघमोडे नगर, स्वामी मळा, बजरंग नगर, शरद नगर, शांत कॉलनी, कापसे प्लॉट, लाडले मशायक कॉलनी, अवधूत कॉलनी, धोडीकोका नगर, एस.टी. कॉलनी, रामकृष्णनगर, अहिल्यानगर, गोमटेशनगर, आंबा चौक, यशवंतनगर, आलिशान कॉलनी, टी.डी. लाड नगर, कुपवाड गावठाण विस्तारित भागात रस्ते आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध नाही. पिण्याचे पाणी कमी दाबाने व अपुरे मिळते काही भागात स्ट्रीटलाइट सुद्धा नाहीत. तो आम्हा कुपवाडकरांना मान्य नाही. सदरच्या वाढीव घरपट्टी आकारणी ही भांडवलीमूल्याच्या (रेडीरेकनर दराच्या) आधारे न लावता चटई क्षेत्रा नुसार आकारणी करावी. आम्हा कुपवाड मधील समस्तनागरिकांचा विरोध आहे. दिनांक २३/०६/२०२६ रोजी महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सह्यांची मोहीम व प्रतिक्रिया नोंद घेण्यात आली होती. याला कुपवाडकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तरी त्यानंतर दिनांक २५/०६/२०२६ रोजी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या उपआयुक्त सौ. अश्विनी पाटील मॅडम यांना निवेदन सादर करून कुपवाडकरांच्या भावना पोहचविल्या होत्या. तरी या मागणीचा विचार करून दिनांक २९/०६/२०२६ पर्यंत यावर निर्णय घ्यावा. अशी विनंती केली होती. तरी सदर वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिनांक २९/०६/२०२६ पर्यंत या मागणीचा विचार करून वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीची घरपट्टी आकारणी पूर्वीप्रमाणे ठेवण्यात यावी. अन्यथा मंगळवार दिनांक ३०/०६/२०२६ रोजी कुपवाड शहर संघर्ष समिती व कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या वतीने प्रभाग समिती कार्यालय क्रं. ३ समोर घंटा नाद आंदोलन करण्यात येईल.व मनपा प्रशासनाचा निषेध करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला होता. महानगरपालिका प्रशासनाने यावर कोणताही तोडगा न काढल्यामुळे आज हे लक्षवेधी घंटानाद आंदोलन करत करण्यात आले.याची ही दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात कुपवाडकर नागरिकांना घेऊन मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारले जाईल.याची महानगरपालिका प्रशासनाने नोंद घ्यावी..
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की,माजी उपमहापौर मोहनबापू जाधव,नगरसेवक प्रकाश पाटील, रवींद्र पाटील,प्रणव पाटील , बाळासाहेब मंगसुळे, राजू पाटील,शिवसेनेचे संतोष पाटील , खोत सर,व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार ,संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रविण कोकरे , संतोष माने , सचिव विलास माळी , खजिनदार प्रकाश व्हनकडे , विठ्ठल सपकाळ , समीर मुजावर , सुरेश साखळकर , महेश निर्मळे, अमोल कदम , व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अमर दिडवळ , उपाध्यक्ष सचिन नरदेकर , उपाध्यक्ष जगन्नाथ वाघमोडे , संचालक लक्ष्मण पाटील , अभिजीत कोल्हापुरे , रमेश भानुषाली , रमेश जाधव , अनिल गडदे, सुरज पवार बाजीराव खरात , सुहास दीक्षित , प्रमोद गौंडाजे , प्रकाश ओव्हाळ ,विनायक बलोलदार , पांडुरंग रूपनर, दादासाहेब रूपनर,साहेबुद्दीन मुजावर , दिलीप धोतरे , सलीम मुजावर , प्रभाकर व्हनकडे,शुभम उपाध्ये ,अब्बास मुजावर , दिनकर चव्हाण , सलीम मुजावर, मुबारक सनदी,रघुनाथ मंगसुळे , फिरोज मुजावर,संदिप पवार, नुरमुहम्मद ढालाईत,असिफ मुजावर, सिकंदर मुल्ला,शकलेन मुजावर , करिम मुजावर, समीर शेख, समीर मकानदार, सर्व पत्रकार बंधू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.