वाढीव घरपट्टी आकारणी त्वरित रद्द करा या मागणीचे निवेदन कुपवाड संघर्ष समितीच्या वतीने आयुक्तांना देण्यात आले. ही कर वाढ त्वरित रद्द केले पाहिजे अन्यथा संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.
सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेने नागरिकांना बजावलेल्या वाढीव घरपट्टी नोटिसांच्या विरोधात कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने मा.आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारी ही अन्यायकारक वाढ तात्काळ रद्द करून घरपट्टी आकारणीचा पुनर्विचार करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
त्यावेळी उपस्थित संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.अशोक रासकर, कार्याध्यक्ष आशुतोष धोतरे, समितीचे ज्येष्ठ सल्लागार अख्तरहुसेन मुजावर, खजिनदार दाऊद मुजावर, भाऊसो पाटील, समितीचे उपाध्यक्ष गोरख व्हनकडे, खजिनदार अरुण रूपनर, समितीचे संचालक रमेश जाधव, अजय जाधव इत्यादी उपस्थित होते.