कुपवाडचे नेते दिवंगत आदरणीय प्रा. शरद पाटील सर यांच्या कुपवाड येथील स्मारकासाठी मा.उपमहापौर श्री गजानन मगदूम यांच्या विशेष प्रयत्नातून महापालिकेकडून रु.1.5 कोटी निधी मंजूर करणेत आला असून तसे पत्र महापालिकेकडून आज दि. 3 जुलै 2026 रोजी प्रदान करण्यात आले.
यावेळी आमदार इद्रिसभाई नायकवडी,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मा.पद्माकर जगदाळे सर,मनपा आयुक्त संजीता महापत्रा मॅडम, मा. सुरेश बापू आवटी,सभागृह नेते संदीप आवटी,विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मंजुरीचे पत्र व नियोजित स्मारकाचे आराखडा स्वर्गीय शरद पाटील सर यांची कुटुंबीयांकडे सुपुर्त करण्यात आला
यावेळी प्राध्यापक शरद पाटील सर यांचे कुटुंबीय, वृद्ध सेवा श्रम कुपवाड, यशवंत शिक्षण संस्था, जनता दल, जैन समाज कुपवाड चे प्रतिनिधी, कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी,शिवप्रेमी मंडळ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समिती,तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व पत्रकार बंधू उपस्थित होते.