नांदेड :- खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या 'प्रिया दूध भांडार,स्वीट मार्ट ॲन्ड नमकीन' च्या नवीन शाखेचा भव्य उद्घाटन आणि शुभारंभ सोहळा दि.५ जुलै २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.शहरातील गुरुद्वारा जुना मोंढा रोड,शहीद पुरा,मुरमुरा गल्ली येथे या नवीन शाखेचा श्रीगणेशा करण्यात आला असून या सोहळ्याला नागरिकांचा व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शाखेचा उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया थाटात करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्याला प्रशासकीय, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या आनंदमयी प्रसंगी उपस्थित राहिलेल्या सर्व स्नेहीजनांचे, मान्यवरांचे आणि ग्राहकांचे स्वागतोत्सुक (श्री. लक्ष्मणराव बैनवाड, श्री. साईनाथ पडोळे, श्री. गणपत बैनवाड, श्री. गोविंदराव बैनवाड, श्री. रावसाहेब पडोळे, श्री. पांडुरंग बैनवाड) आणि निमंत्रक (श्रीकांत बैनवाड, गणेश पडोळे, चंद्रकांत बैनवाड, घनश्याम पाटील, गंगाधर बैनवाड, चंद्रकांत पडोळे) यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.