शाकुंतल एंटरप्राइजेस ‘लाईव्ह प्युअर’चे शानदार उद्घाटन वॉटर प्युरिफायरसह चिमणी,कुकटॉप,डिशवॉशर,मायक्रोवेव्ह ओव्हनची अत्याधुनिक उत्पादने एकाच छताखाली

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 08/08/2026 7:17 PM

नांदेड :- शहरातील श्रीनगर परिसरात मागील वीस वर्षांपासून इन्व्हर्टर व बॅटरीच्या व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या श्री सिद्धी सेल्स कॉर्पोरेशनच्या वतीने आता ‘लाईव्ह प्युअर’ या ब्रँडच्या अत्याधुनिक गृहउपयोगी उपकरणांचे एक्सक्लुझिव्ह आउटलेट सुरू करण्यात आले आहे.शाकुंतल एंटरप्राइजेस, गोकुळ कॉम्प्लेक्स,अशोक नगर, भाग्यनगर रोड,नांदेड येथे या नवीन दालनाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ‘लाईव्ह प्युअर’ कंपनीचे रिजनल सेल्स मॅनेजर श्याम लनन,चेतन शर्मा,चंद्रकांत भुताळे,श्रीपाद मराठे तसेच ब्रांच सर्व्हिस इन्चार्ज प्रेम वानखेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.शाकुंतल एंटरप्राइजेसच्या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक विविध उपकरणे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये वॉटर प्युरिफायर,चिमणी, कुकटॉप,डिशवॉशर,मायक्रोवेव्ह ओव्हन आदी अत्याधुनिक उत्पादनांचा समावेश आहे.विशेष म्हणजे,येथे उपलब्ध असलेले एआय कनेक्टेड डिशवॉशर हे ग्राहकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.तसेच ग्राहकांच्या सुविधेसाठी होम सर्व्हिसची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.वॉटर प्युरिफायरच्या क्षेत्रात ‘लाईव्ह प्युअर’कडून तीन वर्षांची वॉरंटी देण्यात येत असून,ही कंपनीच्या उत्पादनांच्या गुणवत्तेवरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
लाईव्ह प्युअरच्या काही अत्याधुनिक वॉटर प्युरिफायरमध्ये गरम पाण्याची सुविधाही उपलब्ध असून,आधुनिक तंत्रज्ञान,उत्कृष्ट गुणवत्ता आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे ही उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरतील,असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
गजानन विजयकुमार लासिनकर आणि गणेश लक्ष्मण राजकोंडवार यांनी शाकुंतल एंटरप्राइजेसच्या माध्यमातून हे नवीन दालन सुरू केले आहे.नांदेड शहरातील ग्राहकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक गृहउपयोगी उपकरणे उपलब्ध करून देण्यासोबतच विक्रीनंतरची सेवा प्रभावीपणे देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.नांदेड शहरातील ग्राहकांनी या नवीन दालनास भेट देऊन लाईव्ह प्युअरच्या विविध उत्पादनांची माहिती घ्यावी,असे आवाहन शाकुंतल एंटरप्राइजेसच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या