592 कोटीची बिर्याणी खाताना..? घरपट्टीचे हाड घशात अडकणार आहे कारभाऱ्यानो लक्षात ठेवा....?
आयुक्त मॅडम आमदार सुधीर दादा तुमच्या कानात कोण सांगते त्यांच्यापासून सावध राहा...? स्वर्गीय मदन भाऊंचा महापालिकेच्या कारभारात असाच घात झाला...
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची स्थापना होऊन 28 वर्षे झाली एक असं काम नाही की त्याची चर्चा होते त्याचा आदर्श घेतला जातो आणि ते परिपूर्ण झाला आहे
असा कोणताही राजकीय पक्ष आता अपवाद राहिला नाही त्यांची सत्ता आल्या आणि त्यांनी काही तर अपवादात्मक चांगलं काम केलं आहे
असा कोणता आयुक्त लाभला नाही त्यांनी जनभावना ऐकून व महापालिकेचे आर्थिक सामाजिक व भौगोलिक परिस्थिती याचा अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना करून चांगला निर्णय घेतला आहे...
सध्या भांडवली मूल्यावरील घरपट्टी बाबत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत फार मोठा असंतोष निर्माण झाला आहे महापालिका प्रशासकीय काळात सदर निर्णय झाला आहे मात्र त्यानंतर लोकनियुक्त बॉडी घेऊन आता सहा महिने पूर्ण होत आले आहेत मात्र स्वतःची कामे प्रशासकीय यंत्रणेत अडकला नकोत म्हणून काही कळणारे ज्यांना मनपा अधिनियम कळतो ज्यांची कामे आहेत अशा लोकांच्या हे कीखोर व मनमानी कारभारामुळे महानगरपालिकेचे वाटोळे होत आहे नवीन सदस्य आहेत त्यांना कायद्याचा व कामाचा अनुभव नाही त्यात बऱ्याचश्या महिला नगरसेविका आहे त्या बोलू शकत नाहीत या सगळ्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन ज्यांना कळतंय त्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार करायला सुरुवात केली आहे
एकदा निवडणुका झाल्या निकाल लागले की आम्ही अनभिज्ञ सम्राट आमची कोणी काही करू शकत नाही ह्याच अविर्भावात महापालिका स्थापन झाल्यापासून महापालिकेत भ्रष्टाचाराचा कळस आणि आर्थिक वाटोळे झाले आहे
त्यात आता भारीस भर म्हणून ड वर्ग महापालिकेंना आय एस केडर लागू करण्यात आले आहे मात्र हे आहेस केडर म्हणजे आमच्या महापालिकेची प्रयोगशाळा झाली आहे जरा त्यांना महापालिकेच्या कामाचा अनुभव शहराची माहिती होत असते तोपर्यंत त्यांची बदली होते त्यात गुप्तांसारखे महाबाग आले त्यांनी तर पाक वाटोळे केले म आय एस चा फायदा आम्हाला काय हा खरा संशोधनाचा विषय आहे
याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे आमच्या महापालिकेला दोन आमदार लाभले आहेत ते बोलत नाहीत काम करून दाखवतो असं सांगतात मात्र काय करतात रस्ते गटारी विकास निधी आणला मात्र धोरणात्मक निर्णय दीर्घकालीन उपाययोजना याबाबत उदासीनता आहे
यांच्याबाबत काय बोललं तर वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते मग खरं बोलायचं नाही का हा खरा प्रश्न आहे
महापालिका चालली पाहिजे महापालिकेची उत्पन्न वाढले पाहिजे हे आम्हाला सुद्धा कळतं मात्र चुकीच्या पद्धतीने जर घरपट्टी वसूल केली जात असेल त्यातील चुका दाखवल्या असतील तर प्रशासन दुरुस्त का करत नाही आम्हाला अधिकाऱ्यात आम्ही कायद्याने केले आम्ही खुळे आहोत का? आम्ही सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहूनच सुधारणा मागत आहोत एवढं कळत नसेल तर कशाची मस्ती आली आहे प्रशासनाला आणि सत्ताधाराना
कायद्यामध्ये शहरांची आर्थिक सामाजिक भौगोलिक परिस्थिती बघून निर्णय घेणे अपेक्षित आहे चुकीच्या पद्धतीने भारांक लावणे डबल जागेचे व बांधकामांमधून वसुली करणे सदनिकेचे दर लावणे नाकापेक्षा मोती जड उपभोग करता कर आहे अशा अनेक भानगडी आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून महापालिकेचा उपविधी नाही रोड रजिस्टर नाही काय कारभार करतात कशाची अक्कल सांगतात
तुम्हाला अधिकार आहेत म्हणून कसेही वागून चालणार नाही कायदा आणि व्यवहारीचे सांगड घ**** यालाच अक्कल लागते आणि यालाच हुशारी म्हणतात
अजूनही वेळ गेली नाही पालकमंत्री असतील खासदार असतील आमदार असतील या सर्वांनी एकत्रित बसून आम्ही मांडलेल्या सूचनांच्या वर तात्काळ विचार करून समन्वयाने तोडगा काढावा अशी विनंती आहे.
सतीश साखळकर,
वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा