कुपवाड मध्ये १०० टक्के बंद पाळून घरपट्टी वाढीचा निषेध

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/08/2026 8:33 PM

सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने जनतेवर लादलेल्या अन्यायी व घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने आज सांगली,मिरज कुपवाड शहर बंदची हाक दिली होती.

कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती व व्यापारी संघटना,घरपट्टी विरोधी कृती समिती,सर्वपक्षीय नेते,सामाजिक कार्यकर्ते,नागरिक यांच्यावतीने कुपवाड शहर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते.आज करण्यात आलेल्या शहर बंदला कुपवाड मधील व्यापारी,दुकानदार,हातगाडे,भाजी मंडई बंद ठेवून व्यापारी,नागरिक बंधू-भगिनी यांनी मोठा पाठिंबा दर्शवला.कुपवाड शहरात कडकडीत १००% बंद पाळून वाढीव घरपट्टी वाढीचा निषेध व्यक्त केला.

यानंतर घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ कृती समितीच्या सांगली येथील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला विरोध दर्शवला.
मोर्चात सहभागी झालेल्या सर्व नागरिक,
बंधू भगिनी,व्यापारी,सर्वपक्षीय नेते,
सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार..

आपले,

सनी धोतरे.                                            अध्यक्ष-कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती.

बिरू आस्की.
अध्यक्ष-कुपवाड शहर व्यापारी संघटना.

Share

Other News

ताज्या बातम्या