जेष्ठ सत्ताधारी मंडळीनी घरपट्टीचा विषय हातात घेऊन तो निकाली काढावा : व्यापारी एकता असोसिएशन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/08/2026 11:00 AM

 वृत्तपत्रात मा.आयुक्तांनी व्यापारी समाजास अनुसरून एक वक्तव्य केलं आहे, 
दि 4 च्या मोर्चात किमान 3000 व्यापारी सहभागी होते, सगळे 3000 व्यापारी मूर्ख आहेत?की टाईम पास करायला धंदे बंद ठेवून आले होते?
व्यापाऱ्यांची घरपट्टी कमी झाली हा शोध,संशोधन कुठुन केलं?तशी एखादी केस असेल तर निदर्शनास आणून द्यावी,मुळात बहुतांश व्यापाऱ्यांची घरपट्टी 5 पट आली आहे,आणि कमीतकमी तिप्पट तर आलीच आहे,मग असं वक्तव्य करून भांडणं लावणे किंवा गैरसमज पसरवण्याचे शुभकार्य आयुक्त करत आहेत का?
मुळात दुकानाचे रेट रेडिरेकनर व वाणिज्य पकडून भारांक 1.75% लावला तो कसा?
आयुक्तांनी स्वतः वाढीव घरपट्टी कायद्यानुसार आहे का?याचा विवेकबुद्धी ने अभ्यास केला का,नसेल तर सखोल आणि योग्य कायदेतज्ज्ञ सोबत घेऊन अभ्यास करावा व जबाबदारी ने बोलावं,
हजारो लोक चुकीचे आणि तुम्ही बरोबर??
मुळात आपल्या दडपशाही च्या सगळ्या बाबींमुळे आज हजारो लोक रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत,आक्रोश व्यक्त करत आहेत,तरीही आपली अशी टिप्पणी असेल तर हे आमचं दुर्दैव आहे,
अधिकारी चुकीचं बोलून जातो,आणि गैरसमज हा नेत्यांबद्दल होतो व परिणामी त्याचे प्रतिकूल राजकीय परिणाम होतात याचा प्रत्यय अनेकदा पूर्वीच्या सत्ताधारी मंडळींना आला आहे,त्याचीच पुनरावृत्ती करायची असेल तर करा,आमची हरकत नाही,
जेष्ठ सत्ताधारी मंडळींनी हा विषय स्वतः हातात घेऊन समनव्य राखून संपवावा, अधिकारी आज आहेत उद्या नाही,तुम्ही-आम्ही इथंच आहोत,
आम्ही मतं तुम्हाला दिली आहेत,निवडून तुम्ही आला आहात,आणि आमचा अपमान हे अधिकारी करत आहेत,तेही सार्वजनिक, मग लोकांना वाटणार की नेत्यांनी असं बोलायला सांगितलं,
असो...
आम्ही जवाबदार व्यापारी व व्यापारी प्रतिनिधी म्हणून आवाहन करतोय,अजूनही वेळ आहे तोवर ही सगळी प्रक्रिया आपण दिवाळी पर्यंत स्थगित करावी,सगळे एकत्र बसून शहर व महापालिका यांच्या हिताचा व योग्य निर्णय घेऊ,
आपण या माध्यमातून दखल घ्यावी,
धन्यवाद,

*व्यापारी एकता असोसिएशन.

Share

Other News

ताज्या बातम्या